नाशिकच्या प्रविण धोंडगेला सॉफ्टबॉल स्पर्धेत सुवर्ण पदक
इगतपुरी, दि. 07, मे - प्रदिर्घ इच्छाशक्ती आणि मेहनतीने कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकते. इगतपुरी तालुक्यातील कुर्हेगाव येथील रहिवासी भाऊसाहेब शिवराम धोंगडे यांचे सुपुत्र प्रविण धोंगडे याने ही गोष्ट साध्य करत अजून एक मानाचा तुरा खोवण्यात यश मिळवले आहे.
नुकत्याच थायलँड विरुद्ध भारत यांच्यात झालेल्या सॉफ्टबॉल स्पर्धेत प्रवीणने नेत्रदीपक कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. प्रवीणच्या या कामगिरीमुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक के ले जात आहे.
थायलँड, पटाया व बँकॉक येथे 1 ते 4 मे 2018 रोजी सॉफ्टबेसबॉल सिरीज मध्ये भारतीय मुलांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सिरीज आपल्या नावे केली.सॉफ्टबेसबॉल फेडरेशन ऑफ आशियाच्या मान्यतेने व सॉफ्टबेसबॉल फेडरेशन ऑफ थायलँड आयोजित या इंडो-थायी मुले व मुली सिरीजचे आयोजन करण्यात आले होते.
भारतातील विविध राज्याचे खेळाडू यात नेतृत्व करत होते. मुलांच्या संघात प्रवीण धोंगडे याने उत्कृष्ट पिचींग करून विजय खेचून आणल्याने उत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक देण्यात आले.
नाशिक येथील भोसला मिलटरी स्कुलमध्ये प्रवीण सध्या शिक्षण घेत आहे. लहानपणापासून खेळाची आवड असणार्या प्रवीणने आत्तापर्यंत सॉप्टबॉल स्पर्धेत पंजाब, जालना आदी ठिकाणी खेळतांना जिल्हा पातळीवर तसेच स्थानिक पातळीवर अनेक स्पर्धेतुन घवघवीत यश संपादन करत सुवर्णपदकापर्यंत मजल मारली आहे.
लहानपणापासूनच आवड़ असलेल्या येथे स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. प्रशिक्षक बाळासाहेब रणशूर यांचे मार्गदर्शन लाभले.