अग्रलेख - झुंडशाही !
देशभरात झुंडशाहीचे जारदार वारे वाहत असून, ही झुंडशाही हक-नाक निरपराध लोकांचा जीव घेतांना दिसून येत आहे. मात्र या झुंडशाही काही अचानक जन्माला येत नाही. त्या झुंडशाहीला पोसणारे, कायद्याचे कवच बहाल करणारे, अर्थपुरवठा करणारे, असतात त्यामुळे झुंडशाहीची वाढ होते, आणि ते सामाजिक शांतता बिघडवत विशिष्ट चिवारसरणीचा प्रचार आणि प्रसार करत असतात. गोरक्षा करण्यासाठी अशाच तथाकथित झुंडशाही आजमितीस रस्त्यावर उतरल्या आहेत. अशाच झुंडशाहीने मध्यप्रदेशातील सतना या जिल्ह्यातील अमगार गावात गोवंशाची हत्या केल्याच्या कारणांवरून दोन जणांना जबर मारहाण करण्यात आली, त्यात एकाचा मृत्यू झाला. या झुंडशाही मधल्या काही दिवसांपुरत्या शांत झाल्या होत्या. मात्र या हत्येमुळे या झुंडशाही पुन्हा रस्त्यावर उतरतांना दिसून येत आहे. यातुन पुढील राजकीय नांदी बघण्याचे चिन्हे मिळू शकतात. यापूर्वी देखील दादरी, झारखंडमधील रामगड येथे कथित गोरक्षकांच्या झुंडशाहींनी अनेकांचे जीव घेतले आहे. या झुंडशाहीतून सरकारची धोरणे प्रभावीत होत असल्याचे दसून येते. गाय किंवा गोवंशाच्या कत्तलीवर बंदी घालण्याची, कायदे बनविण्याची, व जन्मठेपेसारख्या शिक्षेची तरतूद करण्याची पंरपरा विविध राज्यांमध्ये सुरू आहे. याचाच आधार घेत झुृंडशाही कायदा हातात घेऊ न अनेकांना संशयाच्या नजरेने बघत त्यांच्यावर हल्ले करत आहे. त्यात अनेकांचा बळी जात आहे. गोहत्याबंदीला धर्माचा, तसेच देशप्रेमाचा टिळा लागल्यापासून हिंदुत्ववादी संघटनांमधील स्वयंघोषित गोरक्षकांच्या झुंडी चौखूर उधळल्या आहेत. केवळ संशयापोटी हमरस्त्यांवरून जाणारी वाहने अडविणे, त्यात जनावरे वा मांस दिसले की ते गोमांसच आहे असे गृहीत धरून कायदा हातात घेणे, लोकांना बेदम मारहाण करणे असे सामूहिक उन्मादाचे प्रकार गेली दीड-दोन वर्षे सुरू आहेत. देशात तथाकथित गोरक्षण करणारे या प ृथ्वीतलावर एकाककी अवतरले नाही. केंद्रामध्ये आणि विविध राज्यात भाजपाचे सरकार येण्यापूर्वी तथाकथित गोरक्षक कुठे होते माहित नाही. मात्र भाजपाचे सरकार सत्तेवर आले, आणि तथाकथित गोरक्षक रस्त्यावर आले. त्यांची गोरक्षा जागृत झाली. वास्तविक हा मुद्दा सध्या सर्वांत जास्त चर्चिला जात आहे. कारण सातत्याने होणारे हल्ले, आणि त्यात जाणारे जीव, यामुळे संपूर्ण समाजमन एवळून निघाले असतांना देखील या झुंडशाहीचा दरारा कमी झाला नाही. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तथाकथित गोरक्षकांला चांगलेच सुनावले, असले तरी या झुंडशाही काही कमी होण्याची शक्यता नाही. उत्तरप्रदेश राज्यात देखील झुंडशाहीचे हल्ले वाढत आहे, मात्र प्रशासन हतबल झाल्यासारखे वागत आहे, आणि या झुंडशाहीला एकप्रकारे पोसत असल्याचेच दिसून येते. दिल्लीला खेटून असलेल्या दादरी गावात दीड वर्षापूर्वी मोहम्मद अखलाख या व्यक्तीचा अशा उन्मादात बळी गेला. त्यावरून देशभर गदारोळ माजला. राजस्थान, गुजरात, झारखंड अशा अन्य काही राज्यांमध्ये, विशेषत: जेथे भाजपची सत्ता आहे तेथे हे प्रकार त्यानंतरही सुरू आहेत. लोकशाही, व कायदा अस्त्विात असलेल्या देशात संविधानाला सार्वर्भौम मानून, त्या कायद्यानुसार सुव्यवस्था सांभाळण्यावर विश्वास नाही, असाच प्रकार त्यांच्या झुंडशाहीतून दिसून येतो. गोरक्षांच्या नावाखाली उघड उघड झुंडशाही जोपासणे व निरनिराळ्या झेंड्यांच्या झुंडहृदय’- सम्राटांच्या रूपात घटनाबाह्य सत्ताकेंद्रे उभी करण्याचा सपाटा लावलेला आहे. हे लोकशाहीसाठी- किंबहुना सभ्य समाजधारणेसाठी अत्यंत धोक्याचे आहे. परंतु, अशा घटनांच्या वेळी लक्ष्य’ बनवलेल्या व्यक्ती किंवा कलाकृतीचे मूल्यमापन करण्याचा मोह पडत राहतो.