Breaking News

केरळमध्ये ‘निपाह’ व्हायरसचा प्रकोप ; 9 जणांचा मृत्यू

कोझीकोड - तीव्र तापामुळे केरळमधील कालिकत जिल्ह्यात नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. या नऊ जणांपैकी तिघांचा मृत्यू निपाह वायरसच्या आजारामुळे झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. इतर सात मृतांचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.

इतर सात मृतांचे नमुने व्हायरॉलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ मणीपाल येथे पाठवण्यात आले आहेत. अधिक चौकशीसाठी जिल्हाधिकारी यू. व्ही. जोस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास स मिती नेमण्यात आली आहे, अशी माहिती एका आरोग्य अधिकार्‍याने दिली. दरम्यान आरोग्य विभागाने आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेत कोझीकोड येथे आज आपात्क ालीन बैठक बोलावली. निपाह वायरसमुळे प्राणी व मनुष्यामध्ये घातक आजार निर्माण होतो. मानवी संपर्क, शरीरातील द्रव्ये, थुंकी व खोकल्याच्या माध्यमातून या वायरसचा प्रसार होतो. नड्डा यांनी राष्ट्रीय रोगनियंत्रण केंद्राच्या संचालकांना जिल्ह्याला भेट देऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले. यापूर्वीही कोझीकोड येथे निपाह वायरसमुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.