Breaking News

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रतिभेचे राष्ट्रीय स्तरावर कौतुक


नवी दिल्ली : ऑटोमोबाईल कंपन्यातील पाण्याचा पुनर्वापर, औद्योगिक क्षेत्रातील सांडपाण्याचे व्यवस्थापन, सोलर वॉटर बल्ब आणि आयुस्प्रे हे महत्वाचे संशोधन मांडणाऱ्या महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या संशोधनासह देशातील शालेय विद्यार्थ्यांनी ३० महत्वपूर्ण संशोधन करून संशोधकवृत्तीचे दर्शन घडविले आहे.

नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या 'अटल टिंकरिंग इनोव्हेशन मॅरॉथॉन' स्पर्धेत निवड झालेल्या देशातील सर्वोत्तम ३० विद्यार्थी संशोधनांची आज निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ.राजीव कुमार आणि अटल इन्होवेशन मिशनचे संचालक रमनन रामनाथन यांनी निती आयोगाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचे औचित्य साधून यावेळी उभय मान्यवरांनी 'अटल टिंकरिंग इनोव्हेशन मॅराथॉन' मध्ये निवड झालेल्या संशोधनाचा समावेश असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन केले.