Breaking News

राज्यभरात हरभरा खरेदीची १९७ केंद्रे सुरू ; ५ लाख क्विंटलहून अधिक हरभरा खरेदी - सहकारमंत्री सुभाष देशमुख


मुंबई : किमान आधारभूत किंमत योजनेनुसार राज्यभरात हरभरा खरेदीची १९७ केंद्रे सुरू असुन काल दि. ९ मेपर्यंत ५ लाख ५८ हजार ६१ क्विंटल हरभरा खरेदी झाल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली.

हरभरा खरेदीसाठी गतवर्षीचे आधारभूत दर ४ हजार रू प्रती क्विंटल असे होते तर यावर्षी हा दर ४ हजार ४०० रू प्रती क्विंटल आहे. हरभरा खरेदीला १ मार्चपासून सुरूवात झाली असून यावर्षी ३० लाख क्विंटल एवढे खरेदीचे उद्द‍िष्ट आहे. ४० हजार ५९८ शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी करण्यात आलेला आहे. राज्यात पणन महासंघ व विदर्भ पणन महासंघाकडून हरभरा खरेदी करण्यात येत आहे.