महाराष्ट्रातील उच्च शिक्षण संस्थांना रुसाकडून ३४० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर
या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील फर्ग्युसन महाविद्यालय हे भारतातील पहिल्या तीन संस्थांमधील मानकरी ठरले आहे. ही बाब राज्यासाठी निश्चितच अभिमानस्पद आहे. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान परिषद (रुसा परिषद) ने राज्याच्या उच्च शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठीचा बृहत आराखडा तयार केला असून या आराखड्यामध्ये महाविद्यालयांची स्वायत्ता, स्वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठाचा दर्जा देणे, महाविद्यालयांच्या गटाला क्लस्टर (समूह) विद्यापीठाचा दर्जा देणे, संशोधन, नवोपक्रम, अध्ययन,अध्यापनाच्या पध्दतीतील गुणवत्ता वाढ मूल्यमापनाच्या नवनवीन पध्दती आदींवर भर देण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज दिली.