ग्राहकांच्या हितास्तव ३५ रू. प्रतिकिलो दराने तूर डाळ विक्रीचा निर्णय - पणनमंत्री सुभाष देशमुख
या निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्यांचे आभार मानले. श्री. देशमुख म्हणाले, या निर्णयाने या हंगामात खरेदी केलेली व पुढील कालावधीत खरेदी करावयाच्या तूर साठवणुकीसाठी गोदामे रिकामी होण्यास मदत होईल. थेट ग्राहकांना लाभ होण्यासाठी बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत ५५ रू प्रती किलो ऐवजी ३५ रु प्रती किलो दराने तूर डाळ विक्रीचा निर्णय महत्त्वाचा आहे.