Breaking News

एमजीडीचे शिर्डीमध्ये दोन दिवसीय स्नेहसंमेलनाचे आयोजन

एमजीडी हे मातंग समाजाचे समाजसेवी संघटन असून या संघटनेचे वैशिष्ट्य असे आहे की, यामध्ये कोणी एक प्रमुख नाही, समाजातील प्रत्येक व्यक्तिस या संघटनेमध्ये विनामुल्य सभासद होता येते. एमजीडी म्हणजे मातंग ग्रूप डेव्हलपमेंट या संघटनेचे बोधवाक्य टूगेदर वूई कॅन असे आहे.


आज मातंग समाज शिक्षणामध्ये मागे असल्यामुळे दारिद्ˆयात आजही खितपत पडला आहे. यातून समाजाला बाहेर काढायचे असेल तर, शैक्षणिक प्रगतीवर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे, तसेच शिक्षीत तरूणांना उच्चशिक्षणासाठी प्रवृत्त करणे तसेच स्पर्धा परिक्षांची तयारी करवून तरूणांना शासकीय नोकर्‍या मिळवून देण्यात मदत करणे असे या संघटनेचे उद्दिष्ट आहे. 
2016 मध्ये लोणावळा येथे यापुर्वीचे संमेलन साजरे झाले होते. या संमेलनामध्ये 3 हजारांहून अधिक समाजबांधव एकत्र आले होते. त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मातंग समाजाचे आमदार, मंत्री यांनी आपली उपस्थिती दर्शविली होती. या संमेलनामध्ये विविध राजकीय पक्षातील समाज बांधव नेते मंडळींनाही सहभागी होता येते. 
यावर्षी हे संमेलन शिर्डी येथील साई पालखी निवारा हॉटेल येथे होत असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमधून समाज बांधव सहभागी होणार असून, यांसह गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक, दिल्ली, हरियाना, पंजाब येथील समाज बांधव देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत, साधारणतः या संमेलनात 5 हजारांहून अधिक समाज बांधव एकत्र येणार असून या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार आहेत. 
या कार्यक्रमासाठी येणार्‍या सर्व समाज बांधवांसाठी चहा, नाष्त्यासह जेवण आणि निवासाची सोय मोफत करण्यात आली असून, या स्नेहसंमेलनास उपस्थित राहण्यास इच्छूक असणार्‍या समाज बांधवानी आपली नावे आयोजकांकडे नोंदविण्याचे आवाहन अहमदनगर जिल्हा एमजीडी समितीने केले आहे.