चंपावतमध्ये ट्रक अपघातात 10 भाविकांचा मृत्यू
चंपावत: टनकपूर भागात वेगवान ट्रकने चिरडल्याने 10 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 18 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 8 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून दुसर्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. अपघातातील सर्व लोक उत्तरप्रदेशचे रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे 4.30 वाजता घडली. सर्व लोक पालखीसोबतच पायी टनकपूर जवळच्या पूर्णागिरी मंदिरात दर्शनासाठी चालले होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. संबंधित भाविकांचा हा जथ्था रात्री विश्रामानंतर चक्रपूर येथून टनकपूरच्या दिशेने चालला होता. तेव्हा बौना गिरी रोडवरील बिचई येथे मागून येणार्या भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले.