Breaking News

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर ; पुन्हा एकदा मुलींची बाजी

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या 2017-18 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर होणार झाला असून पुन्हा एकदा या पीरक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. मेघना श्रीवास्तव ही टॉपर ठरली आहे. तिला 500 गुणांपैकी 499 गुण मिळाले आहेत. तर यावषी तब्बल 88.31 टक्के मुली उतीर्ण झाल्या आहेत. नोएडाची मेघना श्रीवास्तव यावषी ’टॉपर’ ठरली असून 498 गुण मिळवित अनुष्का चंद्रा हिनं दुसरा क्रमांक पटकावला आहे. 497 गुण मिळवून चाहत बोधराज तिसऱया क्रमांकावर राहिली आहे. विशेष म्हणजे, टॉप 3 मध्ये तिन्ही मुलीच आहेत. दिव्यांगांमध्ये 492 गुण मिळवून विजय गणेश प्रथम आला असून पूजा कुमारी दुसरी आली आहे. तिला 498 गुण मिळाले आहेत. देशातील 4 हजार 138 परीक्षा केंद्रावर; तर परदेशातील 71 केंद्रांवर 5 मार्च ते 13 एप्रिल दरम्यान ही परीक्षा झाली होती. एकूण 11 लाख 86 हजार 306 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 83.1 टक्के विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. दरम्यान, लवकरच दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती सीबीएसईने दिली आहे.