Breaking News

काश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा जवानांनी उधळला घुसखोरीचा डाव

श्रीनगर - नियंत्रण रेषेवर घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न लष्काराच्या जवानांनी उधळून लावला. लष्कराच्या जवानांनी केलेल्या कारवाईत पाच दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. तांगधर परिसरात जवानांनी ही कारवाई केली. कारवाईचे सविस्तर वृत्त अद्यापपर्यंत हाती आले नसून मोहीम सुरू असल्याची माहिती लष्कराच्या अधिकार्‍यांनी दिली. रमजानच्या काळात भारतीय सैन्याने शस्त्रसंधी घोषित केली होती. मात्र, दहशतवादी संघटनांकडून हल्ले सुरूच असल्याने सैन्याने कारवाईदाखल प्रत्युत्तर दिले आहे. 

जम्मू-काश्मीरच्या तंगधर सेक्टरमध्ये लष्कराच्या जवानांनी धडक कारवाई करत दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत जवानांनी पाच अतिरेक्यांना कंठस्नान घातले अजूनही चकमक सुरू आहे. रमझानच्या काळात केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील सुरक्षारक्षकांना सशर्त शस्त्रसंधीचे आदेश दिले होते. दहशतवाद्यांकडून हल्ला झाला, तर त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल, पण भारत स्वतःहून असं ऑपरेशन करणार नाही, अशी भूमिका केंद्राने घेतली होती. त्याचा गैरफायदा घेत दहशतवाद्यांच्या आणि पाकिस्तानच्या सीमेवरील कुरापती वाढल्या होत्या. परंतु, आज लष्कराने त्यांना आपला हिसका दाखवला. पहाटेच्या अंधाराचा फायदा घेऊन पाच दहशतवादी तंगधर सेक्टरमधून भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्याची कुणकुण लागताच जवानांनी त्यांना घेरलं आणि चकमक उडाली. त्यात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारताचे वीर यशस्वी झाले. आता या संपूर्ण भागात ’सर्च ऑपरेशन’ सुरू आहे.