Breaking News

पेट्रोल डिझेलच्या दरावरून विरोधक कडाडले


केंद्रातील एनडीएप्रणित सरकारला शनिवारी 4 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने विरोधकांनी सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत पंतप्रधानांना लक्ष्य केले. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सरकावर निशाणा साधत मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. मायावती यांनी इंधन दरवाढीवरून सरकारला धारेवर धरले. आपल्या कार्यकाळात करत असलेली कामे ऐतिहासिक असल्याचा दावा मोदी प्रत्येकवेळी करतात. त्यामुळे देशात गगनाला भिडलेले इंधनाचे भाव देखील ऐतिहासिक असल्याचा उपरोधिक टोला मायावती यांनी लगावला. गेल्या 4 वर्षात देशात मोदींचे भाषण म्हणजेच प्रशासन असल्यासारखी स्थिती आहे. मोदी सरकारने आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांमुळे जनतेवर आपत्ती ओढावल्याची टीका कॉग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केली.