मुंबईकरांनो आठवडाभर पाणी उकळून प्या
मुंबई - येत्या काही दिवसात मुंबईत गढूळ पाण्याचा पुरवठा होणार असल्याने बीएमसीने आठवडाभर पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले आहे. रोगराई पसरू नये म्हणून मुंबई महापालिकेने ही सूचना जारी केली आहे. घाटकोपर जलाशयाच्या टाकीचे काम पूर्ण झाल्यानंतर जलाशय 7 मे पासून सुरु होणार आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा मुंबईकरांना होणार आहे. विशेषतः बीएमसीच्या एल आणि एन या विभागांमध्ये जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचे पालिकेच्या अधिकार्यांनी सांगितलं आहे.