मुंबई : खरीप हंगामाची पूर्व आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर आणि कृषी अधिकार्यांसोबत आज मुंबई येथे पार पडली. मात्र या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. जिल्ह्याधिकार्यांनी आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना प्रेझेंटेशन दाखवले. मात्र यावेळी मुख्यमंत्र्यानी चांगलं सादरीकरण करून फायदा नाही तर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असे सांगत अधिकार्यांना मुख्यमंत्र्यानी चांगलेच सुनावले. तसेच प्रेझेंटेशन करायला फारसे काही करावे लागत नाही, डेटा नेटवरून काढता येतो असे सांगत मुख्यमंत्र्यांनी अधिकार्यांना खडेबोल सुनावले. प्रेझेंटेशन करायला फारसे काही लागत नाही. डेटा नेट वरून काढता येतो. जलयुक्त शिवारचे काम मिशन मोड वर करा, असे सांगत वॉटर कपसाठी अनेक गावांत लोक उत्साहाने काम करत आहेत. पण डिझेलसाठी पैसे दिले जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे लोकांच्या मनात सारकरविषयी चांगली भूमिका बनत नाही. त्यामुळे पैसे आम्ही दिले तर ते खाली लोकांना वेळेत दिले पाहिजेत, असे खडेबोल मुख्यमंत्र्यांनी सुनावले.
खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या अधिकार्यांना कानपिचक्या
Reviewed by Dainik Lokmanthan
on
08:15
Rating: 5