Breaking News

काँग्रेसच्या जाहीरनाम्याविरोधात याचिका दाखल

नवी दिल्ली - कर्नाटक विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या जाहीरनाम्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका राष्ट्रीय हिंदू सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालीक यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर 10 मेला सुनावणी होणार आहे. याचिकेत मुतालिक यांनी म्हटले आहे, की काँग्रेसच्या जाहीरनाम्यात धर्माच्या नावावर मते मागितली आहेत. अशा प्रकारे तथाकथितरित्या धार्मिक भेदभावात लिप्त असल्याप्रकरणी निवडणुकीत भाग घेतलेले काँग्रेसचे सर्व उमेदवार अपात्र ठरतील. 
या याचिकेत म्हणण्यात आले आहे, की काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात मुस्लीम आणि इतर अल्पसंख्याकांना विविध योजनांचे आमिष दाखवून मते मागीतली आहेत. हे क ायद्याच्या कलम 15 आणि 27 नुसार निषिद्ध आहे. एवढेच नाही, तर काँग्रेसचा जाहीरनामा लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या तरतुदींचेही उल्लंघन करतो, असेही या याचिकेत म्हणण्यात आले आहे.