उत्तर भारतात भुकंपाचे धक्के
नवी दिल्ली: उत्तर भारतात बुधवारी भुंकपाचे धक्के जाणवले असून, या भुकंपाचा केंद्रबिंदु हिंदुकुश पर्वतरांगांमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाचा धक्का सर्वप्रथम क ाश्मिरमध्ये 4 रिश्टर स्केलच्या च्या आसपास जाणवले. त्यानंतर दिल्लीत जाणवले. या भूकंपांमुळे भारतात अजूनतरी कुठलीही जीवीतहानी झालेली नाही. अफगाणिस्तान-पाकि स्तानमध्ये मात्र भूकंपामुळे पळापळ झाली आहे. अफगाणिस्तान पाकिस्तानमध्ये झालेल्या भुकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल इतकी होती. त्यानंतर भारतात उत्तर भारतात अनेक ठिकाणी भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. यात दिल्ली ,पंजाब, चंदीगड, हरयाणा,जम्मू आणि हिमाचलच्या काही भागांचा समावेश आहे.