Breaking News

मोटर वाहन निरीक्षकपदी ‘संजीवनी’चे विद्यार्थी


कोपरगांव शहर प्रतिनिधी  - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल एप्रिलमध्ये जाहीर झाले. यामध्ये संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या व संजीवनी अभियांत्रिकी दोन विद्यार्थ्यांची सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकपदावर निवड झाली आहे.

येथील ‘संजीवनी’च्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मार्फत शेकडो विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याबरोबरच लोकसेवा व राज्यसेवा परीक्षांचे मार्गदर्शनही दिले जाते. याची फलश्रुती म्हणून एकाच बॅचमध्ये तब्बल अकरा विद्यार्थ्यांची वर्णी शासकीय सेवेत लागली आहे, अशी माहिती संजीवनीच्यावतीने देण्यात आली आहे. संजीवनीच्यावतीने या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

यावेळी संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे यांचे हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे , प्राचार्य डी. एन. क्यातनवार, उपप्राचार्य ए. जी. ठाकूर, प्राचार्य ए. आर. मिरीकर, संगणकतज्ञ विजय नायडू व विरेश अग्रवाल आदी उपस्थित होते.