Breaking News

रस्त्यावर दूध फेकून आंदोलनाचा ’प्रहार’


सोलापूर, दि. 08, मे - शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार शेतकरी संघटनेने रस्त्यावर दूध ओतून दिले. विजापूर रस्त्यावर हे आंदोलन झाले. संघटनेचे शहरप्रमुख अजित कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक एकवटले होते. राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात आहे. 

कर्जमाफीच्या गाजराने त्याचे काही भले झालेले नाही. उलट आत्महत्या करण्याची वेळ आली. शेतमालाला योग्य भाव नाही. जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय आहे. परंतु पाण्याची बाटली 20 रुपयांना मिळते. दुधालाही तेवढाही दर नाही. अशा स्थितीत शेतकर्‍यांनी करावे काय? असा प्रश्‍न कु लकर्णी यांनी या वेळी उपस्थित केला. याबाबत दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना अनेक वेळा निवेदने दिली. दखल घेत नाही म्हणून त्यांचा निषेधही केला. पण आता रस्त्यावरच्या लढाई शिवाय पर्याय नसल्याचे मतही त्यांनी नोंदवले.