Breaking News

शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवर संघटनेचा लघुपट


सोलापूर, दि. 08, मे - पाण्याचे दुर्भिक्ष, सावकाराचे काढलेले कर्ज आणि ओढवलेली नैसर्गिक आपत्ती यातून कसा मार्ग काढणार शेतकरी. त्यातच त्याची बाजारातून शेतीमालाला मिळालेली कमी किंमत आणि नैराश्यातून त्याने केलेली आत्महत्या आदी गोष्टींना जवळून पाहणार्‍या शेतकरी संघटनेने या सर्व गोष्टींवर ती काळी आई नावाचे लघुपट काढलेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामूद पटेल आणि जिल्हा सचिव उमा शंकर पाटील यांच्या पुढाकाराने याची निर्मिती करण्यात आलेली आहे. 

चित्रपटाचे दिग्दर्शन मोहसीन बिराजदार यांचे असून या लघुपटामध्ये शेतकरी संघटनेच्या विविध पदाधिकार्‍यांसह स्थानिक कलावंतांचा समावेश आहे. याचे चित्रीकरण सोलापूर परिसरासह अंत्रोळी आणि टाकळी पूल येथे करण्यात आलेले आहे. 26 मिनिटांच्या लघुपटात शेतकर्‍यांच्या जीवनाची कहाणी दर्शविण्यात आली आहे.