Breaking News

ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी सहकार हाच पर्याय - ड्. एस. बी. पाटील

पुणे, दि. 06, मे - सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्र समृध्द झाला आहे. सहकार क्षेत्राच्या उन्नत्तीमध्ये अर्थतज्ज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ यांचे मोठे योगदान आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सक्षमीक रणासाठी सहकार हाच एकमेव पर्याय असल्याचे डॉ. गाडगीळ यांनी मांडलेले सूत्र आजच्या घडीलाही तंतोतंत लागू असल्याचे प्रतिपादन मंत्रालयातील निवृत्त सहसचिव ङ एस. बी. पाटील यांनी आज व्यक्त केले.अर्थतज्ज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या 47व्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्यावतीने आयोजित ‘डॉ. धनंजयराव गाडगीळ स्मृती व्याख्यान 2018’मध्ये ‘सहकारी पतपुरवठा व डॉ. धनंजयराव गाडगीळ यांचे विचार’ या विषयावर ङ एस. बी. पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष डॉ. प्रतापराव पाटील होते.
ङ एस. बी. पाटील म्हणाले, सावकारी कर्जाच्या पाशातून शेतकरी व सर्वसामान्यांची सुटका व्हावी यासाठी संस्थात्मक पतपुरवठा संस्था निर्माण करण्यात आल्या. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सक्षमीक रणात या संस्थात्मक पतपुरवठा संस्थांचे महत्वाचे स्थान असल्याचे डॉ. गाडगीळ यांनी सांगितले होते. त्यासाठी त्यांनी ग्रामीण पतपुरवठा संस्थांच्या सक्षमीकरणावर भर दिला.

सहकारी क्षेत्र आणखी सक्षम करण्यासाठी पतपुरवठा संस्थांच्या अधिकारी, कर्मचार्‍यांबरोबरच संचालक मंडळालाही वेळोवेळी प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. तसेच सहकार कायद्यात होणार्‍या बदलांच्या माहितीसह सभासदांना त्यांचे हक्क, जबाबदार्‍या आणि कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी वेळोवेळी त्यांचे प्रबोधन करण्याची आवश्यकता असल्याचे ड. पाटील यांनी सांगितले. सहकार चळवळ सशक्त करण्यासाठी जनजागृतीबरोबरच सहकारी चळवळीत महिला व युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
डॉ. प्रतापराव पाटील म्हणाले, सहकार चळवळ सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्यावतीने विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. शिक्षण आणि प्रशिक्षण हेच संघाचे प्रमुख काम असून संघाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सहकार टूरीझम सारख्या नवीन संकल्पना राबविण्यात येणार आहेत.