Breaking News

पवार पब्लिक चॅरिटेबलट्रस्टतर्फे 18 जणांना समाजभूषण पुरस्कार


पुणे, दि. 06, मे - पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वारजे येथे साजरा करण्यात आलेल्या भीम महोत्सवात पुणे जिल्ह्यातील आठ वेगवेगळ्या तालुक्यातील एकूण 19 जणांचा सन्मान करण्यात आला. यात माजी खासदार बाळासाहेब साळुंखे यांना मरणोत्तर भीम रत्न, तर अन्य अठरा जणांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या ’लोक माझे सांगाती’ हे राजकीय आत्मचरित्रपर पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप होते.प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत काम करण्याचे भाग्य लाभलेले माजी खासदार बाळासाहेब साळुंखे यांना मरणोत्तर भिमरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.