Breaking News

कामगारांना देशोधडीला लावण्याचा सरकारचा प्रयत्न - इरफान सय्यद


पुणे, दि. 06, मे - सरकार मालकधार्जिणे आहे. काबाडकष्ट, अंगमेहनतीने काम करणा-या असंघटित माथाडी हमाल कामगारांना योग्य न्याय मिळावा. त्यांचे जीवन सुखकर व्हावे याकरिता माथाडींचे दैवत अण्णासाहेब पाटील यांनी संघर्ष करुन या घटकाला स्थैर्य मिळवून दिले. त्यांना सन्मानाने जगायला शिकविले. माथाडी कामगारांसाठी कायदा केला. परंतु, सरकार माथाडी कायदा रद्द करण्याचा कुटिल डाव रचत आहे. कायदे मोडून कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. या भांडवलशाही सरकारला माथाडी कामगार त्यांची जागा दाखवून देतील, असे मत महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक व कामगार नेते इरफान सय्यद यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र मजदूर संघटनेतर्फे निगडी, वाहतूकनगरी येथील सभागृहात कामगार मेळावा माथाडी कामगारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.