Breaking News

पालिकेची दीड कोटीच्या विकास कामांना मंजुरी


पुण, दि.06, मे - पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासविषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे एक कोटी 57 लाख 88 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.’फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रातील जलःनिसारण नलिकांची वार्षिक ठेकेदारी पध्दतीने साफसफाई करणे व चोकअप काढण्यासाठी येणा-या सुमारे 1 कोटी 35 लाख रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. सारथी हेल्पलाईन अंतर्गत कॉल ऑपरेटर नियुक्त मे. ढशलह 9 सर्विसेस या संस्थेकडून 10 कॉल ऑपरेटर नियुक्त करण्यासाठी येणा-या सुमारे 22 लाख 88 हजार रुपयांच्या खर्चासही स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.