किरकोळ कारणावरून महिलेची हत्या, मानस मुलास अटक
नवी मुंबई, दि. 06, मे - वाशी खाडी किनारी एका पत्र्याच्या पेटीत चार दिवसांपूर्वी एका महिलेचा मृतदेह मिळाला होता. या मृतदेहाची ओळख पटल्यावर पोलीसांनी तिचा मानस मुलगा वय (17) व त्याच्या मित्राला शनिवारी अटक केली.
या प्रकरणी मुलाने या गुन्हयाची कबुली दिली आहे. त्यानुसार या मयत महिलेचे नाव किरण तमा असून तिने एकाला मानस पुत्र मानून लहानपणापासुन त्याचा संभाळ केला. त्याच मुलाने आई आपल्याला वारंवार टोचून बोलत असल्याचा राग मनात धरून अस्लम अहमंद शेख (22) याच्या मदतीने तिचा गळा आवळून खून केला व मृतदेहाची विल्हेवाट लावली होती.
गेल्या 1 मे रोजी वाशी येथील काही लोकांना वाशी हायवे रोड लगत कोरड्या ओढ्यामध्ये एका पत्र्याच्या पेटीतून दुर्गंध येऊ लागल्याने त्यांनी वाशी पोलीस ठाण्यात फोन केला. पोलीसांनी सदर पेटी खोलून पाहिली असता, त्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेचा गळा स्कार्फने आवळून तिला ङ्खार मारण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकिय अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार पोलीसांनी तपासाला सुरुवात केली असता त्यांना या महिलेची ओळख पटली व खून झाल्यानंतर तिचा मुलगा फरार असल्याचे आढळून आल्यावर पोलीसांना त्याच्या वर संशय बळावला आणि त्यांनी त्याचा सुगावा लावून त्याला व त्याच्या मित्राला बेंगलोर येथून अटक केली.