पैठण व्यतिरिक्त अन्य संतपीठ शाखांना परवानगी नको
पैठण : येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संतपीठ उभारणीची घोषणा ३५ वर्षांपूर्वी सरकारने केली होती. मात्र प्रत्यक्षात संतपीठाचे उदघाटन झाल्यानंतरही ते सुरु होऊ शकले नाही. त्यामुळे ते सुरू करण्यासाठी तातडीने कारवाई करावी. त्यानंतरच अन्य ठिकाणी संतपीठाची महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पैठणच्या जनतेतून होत आहे.
पैठण येथील संतपीठाचा आराखडा, अभ्यासक्रम, प्रशासकीय पदनिर्मिती व वर्गपध्दतीबाबत बाळासाहेब भारदे समीतीचा अहवाल शासनाने स्विकारला आहे. संतपीठाचे उदघाटन झाल्यानंतरही संतपीठाचे अभ्यासक्रम वर्ग सुरू न झाल्यामुळे जनतेतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने पैठण येथील संतपीठ सुरू झाल्याशिवाय अन्य ठिकाणी संतपीठाच्या शाखा सुरू करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बंडेराव जोशी, बाळासाहेब घुले, कल्याण बरकसे, संतोष गव्हाने, रमेश पाठक, भिमसिंग बुंदीले, जगन्नाथ जमादार, सुरेश जोशी, किरण जाधव, शहादेव लोहारे, सुरेश शेळके, महादेव दौंड, राम आहुजा, विष्णु ढवळे, गणी बागवान, मुरली साबळे, विलास मोरे, मनोज धोकटे, एकनाथ धुत, तुकाराम बडसल, रतीलाल नागोरी, शंकर सपकाळ आदींसह डॉक्टर, वकील, प्राध्यापक यांनी केली आहे.