दुचाकीचोरास नाकाबंदीदरम्यान अटक
कोपरगाव : शहरात नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी एका दुचाकी चोरास रंगेहात पकडले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, दुसऱ्या गुन्हात् अटक असलेला आरोपी अस्लम उमर कुरेशी {रा. सुभाषनगर ता. कोपरगाव} याने पोलीस कोठडीतील रिमांडदरम्यान सदर दुचाकी {क्र. एम. एच १७ यु. १०५३} ही त्याचा साथीदार श्रीकांत एकनाथ पगारे {रा. सुभाषनगर ता. कोपरगाव याच्या मदतीने चोरल्याची कबुली दिली.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी {दि. २१ } रात्री शहरातील नाकाबंदी दरम्यान आरोपी श्रीकांत एकनाथ पगारे यास या गुन्हयात अटक केली.