Breaking News

... ती वादग्रस्त तालिम बंद करावी; महाराष्ट्र मुस्लिम विकास परिषदेची मागणी


शहरातील जांबवाडी रोडवर असलेली व दुहेरी हत्याकांडाचा कट रचल्याचा आरोप असलेली ती वादग्रस्त शिवशंकर तालिम नगरपरिषद प्रशासनाने त्वरित बंद करण्याची मागणी महाराष्ट्र मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने नगरपरिषदचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, त्या तालिमीतुन वाद निर्माण होऊन जामखेडमधील योगेश राळेभात व राकेश राळेभात या दोन तरूणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शिवशंकर तालिमचे चालक व पैलवानावर पोलीस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तालिम मध्ये गुंडांना प्रशिक्षण देण्याचे काम केले जात आहे. तालिमचा गैरवापर होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जामखेडवाशियांच्या सुरक्षेचा विचार करून नगरपरिषदेने सदर तालिम त्वरित बंद करावी असे निवेदनात म्हटले आहे. मुख्याधिकार्‍यांना निवेदन देतांना महाराष्ट्र मुस्लिम विकास परिषदेचे कार्याध्यक्ष शेरखान पठाण, तालुकाध्यक्ष ताहेरखान पठाण, उपाध्यक्ष हनिफ कूरेशी, बब्बू बागवान, जाकीर जमजम, हारून शेख, जूबेर शेख आदी उपस्थित होते