Breaking News

प्रशासकीय पातळीवर ‘महात्मादिन’ साजरा व्हावा : टेंभे


राहुरी प्रतिनिधी  - ज्योतीबा फुलेंना ‘महात्मा’ ही पदवी लोकांनी बहाल केली होती. दलित आणि निराधारांना न्याय मिळावा, यासाठी  ज्योतिबा फुले यांनी ‘सत्यशोधक समाज’ संघटनेची स्थापना केली. फुले यांची समाजसेवा पाहून दि. ११ मे १८८८ रोज़ी मुंबई येथे एका विशाल सभेत लाखोंच्या उपस्थितीत ज्योतिबा फुलेंना ‘महात्मा’ ही पदवी बहाल करण्यात आली. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर सर्वत्र ‘महात्मादिन’ साजरा करण्यात यावा, अशी मागणी श्री संत सावता माळी युवक संघाचे राहुरी शहराध्यक्ष रोहित टेंभे यांनी केली आहे.यासंदर्भात नायब निवासी तहसीलदार यांना नुकतेच निवेदन देण्यात अाले. या निवेदनात म्हटले आहे, ज्योतिबा फुले यांना पदवी प्रदान झाल्या नंतरच त्यांना ‘महात्मा ज्योतिबा फुले’ या नावाने जगभरात ओळखले जाऊ लागले. ‘महात्मा’ ही पदवी जनतेकडून प्राप्त करणारे संपूर्ण जगात ते पहिले समाजसुधारक आहेत. त्यामुळेच ‘महात्मादिना’स महत्व आहे. त्यामुळे सर्वांनी महात्मादिन मोठ्या उत्साहात साजरा करावा. यावेळी अशोक तुपे, अक्षय मेहेत्रे, सचिन मेहेत्रे, राहुल घोडेकर, जगन्नाथ सूर्यवंशी, संदीप लगे, अभी गुलदगड, ऋषि मेहेत्रे, मनोज घोडेकर, अनिमेश व्यवहारे, तुशार मेहेत्रे आदी उपस्थित होते. या उपक्रमाला पाठिंबा म्हणून वडार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश कुसमुडे हेही यावेळी उपस्थित होते.