Breaking News

तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही


कर्जत  - तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक तर पाच ग्रामपंचायतीच्या सहा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी काल अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. काल पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. कर्जत तालुक्यातील गणेशवाडी, करमणवाडी, वायशेवाडी, खेड, औटेवाडी या पाच ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होणार असून याशिवाय चापडगाव, निमगाव गांगर्डा, सिद्धटेक, खंडाळा येथील एक जागा व लोणी मसदपूर येथील दोन जागांसाठी पोट निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून खेडसाठी जी. जी. बनसोडे पंचायत समिती विस्तार अधिकारी, औटेवाडी, करमणवाडीसाठी एस पी. अनारसे मंडळअधिकारी, गणेशवाडीसाठी बी.यु शिंदे कनिष्ठ अभी. सार्वजनिक बांधकाम उपविभाग कर्जत, वायसेवाडी साठी बरबडे यु जी, कृषी पर्यवेक्षक तालुका कृषी कार्यालय यांची नियुक्ती केली आहे, तर पोट निवडणुकीच्या ग्रामपंचायतीसाठी मंडळ अधिकारी अरगडे यांची नियुक्ती तहसीलदार किरण सावंत यांनी केली आहे. करमणवाडी, वायसेवाडी, औटेवाडी येथे 7 जागा असून गणेशवाडी येथे 9 तर खेड येथे 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. कर्जत तहसील कार्यालयामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत निहाय स्वतंत्र अर्ज स्वीकृतीची व्यवस्था करण्यात आली असून आज अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही.