Breaking News

खा.डॉ.प्रितम मुंडेंचे प्रयत्न यशस्वी

स्वा.रा.ती.मध्ये अस्थिरोग आणि रेडीऑलॉजी विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमांस मंजुरीअंबाजोगाई (प्रतिनिधी): स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रेडीऑलॉजी व अस्थिरोग या दोन विभागांमध्ये सीपीएस अभ्यासक्रमास मंजुरी मिळाली असुन दिड वर्षांपासुन खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांस यश आले आहे.

सदरील अभ्यासक्रम मंजुर झाल्याचे महाराष्ट्र शासनाचे पत्र २४ मे रोजी प्राप्त झाले असुन या शैक्षणीक वर्षापासु येथे आठ पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. गतवर्षी रेडीऑलॉजी विभागाच्या दयनिय अवस्थेचे गार्‍हाणे थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात मांडणार्‍या खासदार डॉ.प्रितमताई यांनी मंत्री सचिव व संचालनालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्याने हे पदव्युत्तर अभ्यासक्रम मंजुर झाल्याची प्रतिक्रीया अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांनी दिली आहे. पदव्युत्तर विद्यार्थी नसल्यामुळे अस्थिरोग व रेडीऑलॉजी विभागातील रुग्णसेवेचा दर्जा सुधार होण्यास अडचणी निर्माण होत होत्या. अस्थिरोग विभाग निर्माण झाल्यापासुन तर २००३ पासुन रेडीऑलॉजी विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रम बंद होते. मधल्या काळात अनेक महिने सोनोग्राफी सुविधा देखील बंद होती. सीपीएस कोर्स चे प्रत्येकी चार पदव्युत्तर विद्यार्थी पुढील महिन्यात प्रवेशित होतील व त्यामुळे अपघात विभाग, हाडाच्या शस्त्रक्रिया, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एक्स रे आदी सुविधांची गुणवत्ता सुधार होऊन चोविस तास चांगली सेवा देण्याचा मार्ग मोकळा होईल असे अधिष्ठाता डॉ.सुधिर देशमुख यांनी नमुद केले आहे. 
रेडीऑलॉजी विभागाच्या अडचणींमुळे एमबीबीएस च्या १०० जागा रद्द होण्याचा धोका निर्माण झाल्यानंतर खासदार डॉ.प्रितमताईंनी स्वा रा ती चे पालकत्व घेऊन अनेक अडचणींवर मात करण्यासाठी वैयक्तिक लक्ष घातल्याने स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास गतवैभव प्राप्त होत आहे असे मत अभ्यागत समिती सदस्य डॉ.पी.एस.पवार, कमलाकर कोपले, राम कुलकर्णी ,कल्पना चौसाळकर, मंगलताई लोखंडे यांनी व्यक्त करुन खासदार डॉ.प्रितमताई मुंडे, आ.संगीताताई ठोंबरे यांसह अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांचे अभिनंदन केले आहे.