Breaking News

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

श्रीरामपूर / श. प्रतिनिधी । शहर तसेच तालुक्याच्या वतीने भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त लुंबिनि बुद्ध विहार श्रीरामपूर या ठिकाणी जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शालेय विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप करण्यात आली. तसेच केक कापून बाळासाहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी भारीप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष किरण साळवी, शहराध्यक्ष दिलिप वाघमारे तसेच भारतीय बौद्धमहासभेचे सुगंधराव इंगळे यांनी वरील कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले. तसेच वरील मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या कार्याबद्दल व त्यांनी समाजाासाठी दिलेल्या योगदानांबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले. तसेच बौद्ध महासभेच्या सरीताताई सावंत यांनीही भाषण केले. या कार्यक्रमासाठी शहर उपाध्यक्षा ज्योत्स्नाताई थोरात, बौद्ध महासभेच्या वैषालीताई अहिरे, सुनिल वाघमारे, भारीप कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक बोरगे, शहरउपाध्यक्ष संतोष त्रिभुवन, शहरसंघटक शेरखान पठाण, वि.प.स.चे कमलेश कांबळे, दीपक नवगीरे, सागर खरात, सुलतान शेख, शिवा दांडगे, संजय साबळे, अर्जुन अमोलीक, अरविंद साळवी, श्रीराम मोरे, कचरू साबळे, अरुण भोसले, बबन गायकवाड, दादासाहेब साळवे, नितीन सोनवणे, संजय पटेकर, अजय हीवराळ, विनोद मोरे, राज मोरे, प्रशांत मोरे, आकाश मोरे, संतोष ऊगले, सचिन ऊगले, मोइनुद्दीन शेख, तुषार साबळे, रोहित साळवे, नितीन बागुल, सोमनाथ खरात, गौतम निळे, संतोष निळे, दौलत हस्के, गणेश अवारे, गौतम सुतार, बाबासाहेब साळवे, आदी कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थीत होते.