Breaking News

हिरडगाव ग्रांमपचायतमध्ये होणार खांदे पालट सरपंच पदासाठी काँटे की टक्कर सरपंच आणि उपसरपंचांचे राजीनामे मंजूर

श्रीगोंदा / प्रतिनिधी । तालुक्यातील हिरडगाव ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये प्रा. तुकाराम दरेकर यांचे गटाला चार जागा मिळल्या तर अंबादास दरेकर गटाला पाच जागा मिळवत निसटते बहूमत मिळाले होते. काठावरचे बहुमत मिळाल्याने सरपंच आणि उपसरपंचपद देताना सदस्यांची मनधरणी करण्यात आली. अडीच वर्ष सरपंच तसेच ऊपसरपंच पदभार कालवधी ठरवण्यात आला. सरपंच मुव्ताजी जाधव व उपसरपंच लक्ष्मण दरेकर यांनी ठरल्यानुसार राजीनामा दिला आणि मंजूरही करण्यात आला. आता सरपंच पदासाठी मनीषा बाळासाहेब शिंदे यांना तर उपसरपंच सुनीता राजेंद्र दरेकर यांचेकडे पदभार सोपविण्यात येणार आहे. मा. जिल्हा परिषद सदस्य कुंडलिकराव दरेकर यांच्या भावजई ं मेघा विठृठल दरेकर सरपंच पदासाठी रिंगणात उतरल्यास शिंदे यांना धोक्याची घंटा ठरणार आहे. प्रा. तुकाराम दरेकर आणि कुडंलिकराव दरेकर हे राजकारणात धुरधंर आणि वाकबर असे नेते आहेत, तालुक्याच्या राजकाराणातील डावपेच ज्ञात आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतची चावी कधीही फिरवू शकतात अशी ग्रामस्तांमध्ये चर्चा आहे.