Breaking News

ग्रामपंचायत निवडणूकीसह पोटनिवडणूकीचे अर्ज दाखल

कर्जत / प्रतिनिधी । 12
 : कर्जत तालुक्यातील पाच ग्रामपंचायती व सहा पोटनिवडणुकीसाठी काल अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. अखेर औटेवाडी येथील तीन जागा, करमनवाडी येथील एक जागा तर वायसेवाडी येथील एका जागेसाठी एक एकच अर्ज आल्यामुळे या जागा बिनविरोध जाहीर होणार. तर लोणी मसदपूर येथील मागासवर्ग प्रवर्गाच्या दोन रिक्त जागासाठी एकही अर्ज आला नाही. कर्जत तालुक्यातील गणेशवाडी, करमणवाडी, वायशेवाडी, खेड, औटेवाडी या पाच ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत असून चापडगाव, निमगाव गांगर्डा, सिद्धटेक, खंडाळा येथील एक जागा व लोणी मसदपूर येथील दोन जागासाठी पोट निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी काल अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून गणेशवाडी येथे सर्वात जास्त अर्ज दाखल झाले. या ठिकाणी सरपंच पदांसाठी शोभा महेंद्र पांडूळे, अंजना दादासाहेब पांडूळे, कल्पना विलास कायगुडे, सविता लालासाहेब कायगुडे, अश्‍विनी संजय कायगुडे, असे पाच अर्ज आले आहेत. तर 9 जागांसाठी एकून 55 अर्ज दाखल करण्यात आले आहे. याठिकाणी बी. यु. शिंदे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत असून त्यांना सहाय्यक म्हणून वास्ते हे आहेत. खेड ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी एकून 40 अर्ज आले असून, सरपंच पदासाठी संगीता दादासाहेब वाघमारे, उज्ज्वला महादेव वाघमारे, कांताबाई नामदेव मोरे, रेणुका सुदाम वाघमारे, आशा विठ्ठल वाघमारे, अमृता सोमनाथ वाघमारे, स्वाती विठ्ठल खंडागळे, जयश्री संजय खंडागळे, सुनीता बलभीम खंडागळे, अशा 9 महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. याठिकाणी जी.जी. बनसोडे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत असून त्यांना सहाय्यक म्हणून नांगरे हे आहेत. करमणवाडी ग्रामपंचायतीच्या 7 जागासाठी 21 अर्ज दाखल झाले असून सरपंच पदासाठी पोपट बापू पवार, भरत संभाजी पावणे, समिराज बाळासाहेब पावणे, राजेंद्र बाळू पवार, अंकुश शिवाजी बनसोडे या पाच व्यक्तींनी अर्ज दाखल केला आहे. या गरम पंचायती मध्ये प्रभाग 1 मधील ना. मा. प्र. महिला जागेवरून मंगल शत्रुघ्न भुजबळ याचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्या बिनविरोध निवडून आल्यात जमा आहेत. याठिकाणी एस.पी अनारसे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. औटेवाडी ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी अवघे 11 अर्ज दाखल झाले असून यातील एक प्रभाग बिनविरोध झाल्यात जमा आहे. येथील सरपंचपदासाठी तात्यासाहेब कापसे, किशोर कापसे, राहुल ढवाण, देविदास महाडिक, सुनील ढगे या पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, येथे प्रभाग 3 मधील तीन या जागांसाठी फक्त एक एकच अर्ज दाखल झाला असल्यामुळे या प्रभागातील राहुल ढवान, रुख्मिणी ढवान, व संगीता ढवान हे तिघे बिनविरोध निवडून आल्यासारखे आहेत. याठिकाणी एस.पी अनारसे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. वायसेवाडी ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी 16 अर्ज दाखल झाले असून यातील एक जागा बिनविरोध झाल्यात जमा आहे. नामाप्र महिला जागेसाठी स्वाती हनुमंत पावणे याचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. येथील सरपंचपदासाठी अनिता विजय पावणे, पल्लवी महारनवर, सुवर्णा दोलताडे, आशाबाई शेटे, अशा 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. याठिकाणी एस पी अनारसे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. कर्जत तालुक्यातील पाच गावांच्या सहा जागासाठी पोटनिवडणूक होत असून यातील खंडाळा, चापडगाव व निमगाव गांगर्डा येथील जागेसाठी प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज आले असून सिद्धटेक येथील एका जागेसाठी चार अर्ज दाखल झाले आहेत, मात्र लोणी मसदपूर येथील मागासवर्ग प्रवर्गाच्या दोन रिक्त जागासाठी एकही अर्ज आला नाही. या पाचही गावांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. एफ आरगडे हे काम पाहत आहेत.