Breaking News

हिमाचलमध्ये बस दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू

नाहन/वृत्तसंस्था : हिमाचल प्रदेशातील सोलन राजगड मार्गावर असलेल्या गिरीपुलाजवळ प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस 150 फूट खोल दरीत कोसळली. यात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. अपघातात दोन महिलांसह 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एका मुलाचा आणि महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बसमध्ये साधारणपणे 26 प्रवासी होते. एसएचओ बलवंत सिंह यांनी या वृत्ताची पुष्टी केली आहे. ही बस (क्र. एचपी 64 9097) मानवा-धामला-सोलन रूटवर सोलनकडे जात होती. बोलले जात आहे, की ही बस अचानकपणे मागच्या बाजूला जात होती. यावर बसचालकाला नियंत्रण ठेवता आले नाही आणि बस दरीत कोसळली. अधिक तपास पोलीस करत आहेत. या अपघातात 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पोलीस आणि स्थानिक लोकांनी सोलन रुग्णालयात दाखल करण्यात आले. एसडीएम नरेश वर्मा यांनी या व ृत्ताची पुष्टी केली आहे.