Breaking News

सेनेनी ती क्लिप अपूर्ण दाखवली : मुख्यमंत्री

पराभव दिसतोय म्हणूनच शिवसेना खालच्या पातळीवर उतरली आहे. जनतेची दिशाभूल करण्यासाठी शिवसेनेने माझी ऑडिओ क्लिप मोडून- तोडून सादर केली. ही संपूर्ण ऑडिओ क्लिप 14 मिनिटांची आहे. मी स्वतः ती क्लिप निवडणूक आयोगाकडे देणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते वसईत बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण क्लिप ऐकवली. तसंच शिवसेनेने त्यांना हवी तशी ऑडिओ क्लिप एडिट केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. साम दाम दंड भेद याचा अर्थ कूटनिती असा होतो, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. सत्ता पक्ष आहोत, सत्तेचा कधीही दुरुपयोग करणार नाही, असं या क्लिपमधील शेवटचं वाक्मय होतं. मात्र ते त्यांनी दाखवलं नाही. ते दाखवलं असतं, तर शिवसेना तोंडावर पडली असती, असं मुख्यमंत्री म्हणाले.