Breaking News

रासेगावला युवकाची हत्याः पोलीसांच्या कर्तव्यप्रतारेणेमुळे गेला बळी


प्रतिनिधी | दिंडोरी तालुक्यातील रासेगाव येथे गाडीने कट मारला या किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी होत एक युवकाचा निर्घुण खून झाला असून पोलिसांनी तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून एक आरोपीस अटक केली असून तीन जण फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे .

याबाबत दिंडोरी पोलिसांकडून मिळालेली माहिती असी कि दिंडोरी तालुक्यातील रासेगाव येथील उत्तम गुलाब लहांगे वय 22 व सुनील संजय लहांगे वय 22 हे गुरुवारी सायंकाळी 5 च्या सुमारास रासेगाव येथे इंदोरे रोड ने जात फिरायला जात असताना संजय सुकदेव बेंडकुळे याने चारचाकी गाडीने येत कट मारला या कारणावरून त्यांचेत किरकोळ वाद झाला .यानंतर पुन्हा रात्री आठ वाजता पाण्याच्या टाकीजवळ वाद होत संजय सुकदेव बेंडकुळे ,संदीप संजय बेंडकुळे ,भावराव पुंडलिक बेंडकुळे ,तानाजी हिरामण बोके सर्व राहणार रासेगाव यांनी वाद घालत संजय बेंडकुळे व तानाजी बोके यांनी सुनील संजय लहांगे याचे हात पकडून ठेवत भावराव बेंडकुळे याने सुनील वर तलवारीने पोटावर वार केला मात्र तो चुकवला यानंतर संजय बेंडकुळे याने तलवारीने त्याचे पोटावर वार केला त्यात सुनील लहांगे गंभीर जखमी झाला त्यास उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याचेवर उपचार सुरु असताना रात्री 12.30 वाजता मृत्यू झाला . दिंडोरी पोलिसांनी मयत उत्तम गुलाब लहांगे याचे फिर्यादीवरून चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून भावराव पुंडलिक बेंडकुळे यास अटक केली असून फरार तिघांचा शोध सुरु आहे .पोलीस उपअधीक्षक देविदास पाटील प्रभारी अधिकारी एम.सुदर्शन यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी अधिक तपास करत आहे .


फिर्याद घेण्यास पोलीस उपनिरीक्षकांची टाळाटाळ नातेवाईकांनी केला संताप व्यक्त
रासेगाव येथे गुरुवारी सायंकाळी दोन गटात वाद होवून त्यात एका युवकावर खुनी हल्ला करण्यात आला यात जखमी युवकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले . यानंतर दोन्ही गट दिंडोरी पोलीस ठाण्यात आल्या त्यातील ज्या गटाने हल्ला केला त्यातील एकाने उमराळे पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांना किरकोळ वाद असल्याचे सांगितले तर दुसरया गटाने आमच्या नातेवाईक युवक सुनील लहांगे यांचेवर खुनी हल्ला झाला असून तो गंभीर जखमी असल्याचे सांगत फिर्याद देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी तसा काही प्रकार नाही किरकोळ घटना आहे असे सांगत जखमीची तब्बेत व्यवस्थित आहे असे सांगुन आपसात मिटवून घेण्याचा अनाहूत सल्ला दिला.मध्यरात्री पर्यंत 20 ते 25 महिला – पुरुष नातेवाईक पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांचेकडे आरोपिंविरूढ फिर्याद दाखल करून घेत आरोपिंविरूढ तत्काळ कारवाई करण्यासाठी गयावया करत होते मात्र ते जखमी ठीक आहे असे सांगत जिल्हा रुग्णालयातून वैद्यकीय अहवाल आल्यावर कारवाई करू असे शिंदे यांनी सांगून नातेवाईकांना घरी जायला सांगितले. प्रसारमाध्यम प्रतिनिधींनाही वृतांकन करण्यापासून रोखले.वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याबाबत कोणतीही माहिती दिली नाही .अखेर रात्री साडे बाराच्या सुमारास जखमी युवकाचा मृत्यू झाल्याची खबर मिळताच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली तातडीने रासेगाव येथे पोलीस पथकाने धाव घेत संशयित आरोपींच्या घरी धाड टाकली .व एक संशयिताला ताब्यात घेतले मात्र मुख्य आरोपीसह तीन जण फरार झाले पोलीस त्यांचा शोध घेत आहे .

चार तास मृतदेह आरोपीच्या घरासमोर
खुनी हल्ला झालेल्या सुनील लहानगे या युवकाच्या मृत्युनंतर नातेवाईकांनी रात्री पोलिसांनी फिर्याद नोंदून न घेतल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला संशयित आरोपी संजय सुकदेव बेंडकुळे याचे घरावर हल्ला करत तेथेच खड्डा खोदत मृत युवकाचे दफन करण्याची भूमिका घेत घरासमोर तब्बल चार तास ठिय्या दिला .सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली पोलीस उपअधीक्षक देविदास पाटील,प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी एम.सुदर्शन यांनी नातेवाईकांची समजूत काढत आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत सुनील लहांगे याचे मृतदेहावर रासेगाव येथील स्मशानभूमीत सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यविधी केला .पोलिसांनी रासेगाव येथे पोलीस बंदोबस्त वाढवला आहे .