कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदी विनिता राणे
ठाणे - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदावर पुन्हा एकदा शिवसेनेने कब्जा केला आहे. बुधवारी पार पडलेल्या निवडणुकीत महापौरपदी शिवसेनेच्या विनिता राणे यांची बिनविरोध निवड झाली. तर उपमहापौरपदी भाजपच्या उपेक्षा भोईर यांची निवड झाली. मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला. महापौर राजेंद्र देवळेकर यांचा अडीच वर्षांचा पहिला कार्यकाळ 11 मे ला संपत असल्याने दुसर्या अडीच वर्षाच्या कार्यकाळासाठी ही निवड झाली.