विराटला कौंटी क्रिकेटसाठी सरेकडून नाममात्र मानधन
नवी दिल्ली प्रतिनिधी - जागतिक क्रीडा विश्वात सर्वाधिक आर्थिक कमाई करणारा क्रिकेटपटू असा विराट कोहली सरे या इंग्लिश कौंटी संघासाठी नाममात्र मानधनावर खेळणार आहे.यामागचे कारण म्हणजे इंग्लंड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या मातब्बर खेळाडूंनी तेथील वातावरणात कौंटी क्रिकेटचा सराव करावा, अशी भारतीय क्रिकेटनियामक मंडळाची धारणा आहे.
येत्या जूनमध्ये इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळणार असल्यामुळे विराट अफगाणिस्तानविरुद्धचा एकमेव कसोटी सामना आणि आर्यलडविरुद्धचे दोनट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार नाही. त्याच्या कराराबाबत बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘विराटचा सरेशी मोठय़ा रकमेचाकरार झाला असेल, अशी क्रिकेटवर्तुळात चर्चा आहे. परंतु यात अजिबात तथ्य नाही. सरे त्याला हवाई प्रवासाचा खर्च, निवासव्यवस्था आणि सामन्याचेनाममात्र मानधन देणार आहे. कोणत्याही सर्वसामान्य कौंटी खेळाडूइतकेच त्याचे सामन्याचे मानधन असणार आहे.’’
१ जूनपासून हा करार सुरू होणार असून, विराटचा पहिला एकदिवसीय सामना या दिवशी केंटशी होणार आहे. दरम्यान, चेतेश्वर पुजाराअफगाणिस्तानविरुद्धचा सामना खेळल्यानंतर इंग्लंडकडे रवाना होणार आहे. तो यॉर्कशायरचे प्रतिनिधित्व करणार आहे.इंग्लंडमध्ये विराट सहा सामनेखेळण्याची शक्यता आहे. यापैकी तीन सामने रॉयल लंडन चषक स्पर्धेतील ५० षटकांचे असतील, तर तीन सामने कौंटी क्रिकेटमधील चार दिवसांचे असणारआहेत.