Breaking News

भाजपला दलितांची घरे पंचतारांकीत हॉटेल वाटत आहेत : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

सातारा : सध्या दलितांवर होणार्‍या वाढत्या अन्यायाबाबत देशभर चिंता व्यक्त करीत असताना स्वत:ची प्रतिमा उजळविण्यासाठी भाजप नेते उत्तर प्रदेश, बिहारमध्ये दलितांच्या घरी स्वत:चे जेवण घेवून जात आहेत. त्यामुळे भाजपला दलितांची घरे पंचतारांकितफ हॉटेल वाटत आहेत. शेतात बसून घरची भाजी-भाकरी जशी खातात तसे भाजपचे नेते दलितांच्या घरात करीत आहेत, अशी खरमरीत टीका भारिपचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

सातारा येथे 20 मे रोजी पंढरपूर येथे होणार्‍या धनगर जाहिर मेळाव्यानिमित्त माहिती देताना ते बोलत होते. 33 समाजाचे प्रतिनिधी आरक्षणासाठी पंढरपूर याठिकाणी एक त्रित येणार आहेत. मराठा समाजालाही आरक्षण देणे हे राज्यकर्त्यांना मान्यच करावे लागणार आहे. त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. ब्रिटीश काळात मद्रासमध्ये कायस्थ ब्राम्हणांना आरक्षण होते, मात्र उत्तरेत नव्हते. भाजप व आरएसएसचा आरक्षण तत्वालाच विरोध आहे. 1992 साली मंडल आयोगाला विरोध करून जातीय आरक्षण रद्द करा, सविंधान बदला अशी हाक दिली होती. सध्या भाजप सरकार राजकीय अस्थिरता आणत असून काँग्रेसचा त्यांना पाठींबा आहे असाही त्यांनी आरोप केला. संभाजी भिडे गुरूंजीबाबत वक्तव्य क रताना अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगीतले, राज्य सरकारने तपास अधिकार्‍यांना फासावर चढवू नये. याबाबत जर कोणी न्यायालयात गेले तर पहिला तपास अधिकार्याचा पहिला बळी जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भिडे यांची अटक थांबवली आहे. धनगर व लिंगायत समाजामध्ये भांडण लावण्याची निती राज्यकर्त्यांनी आखली आहे. सोलापूर येथील अ हिल्याबाई होळकर विद्यापिठ असे नाव देण्याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीच जातीय दंगली होतील असे वक्तव्य करून आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. त्यांनी अ हिल्यादेवीचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.