Breaking News

बेकायदा बांधकामांवरील कारवाईचा अहवाल जनतेसमोर मांडावा- चेतन तुपे


पुणे, दि. 17, मे - कायदा बांधकामांना केवळ नोटीस देउन संबधित बांधकामे वाचविण्यासाठी एजंटांची साखळी निर्माण करणार्या पीएमआरडीएने अगोदर त्यांच्या हद्दीतील बेकायदा बांधकामांवरील कारवाईचा अहवाल जनतेसमोर मांडावा. त्यानंतरच पुणेकरांच्या पाणी वापराचा अहवाल मागावा. पुणेकरांचे पाणी कमी करण्याचा प्रयत्न झाला तर जलसंपदा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी दिला.
पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या नवीन प्रकल्पाचे उदघाटन नुकतेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमामध्ये महाजन यांनी पुणेकर अधिक पाणी वापरतात, असे वक्तव्य केले होते. पुणे शहराला होणा-या पाणी पुरवठ्यात बचत करून अर्धा टीएमसी पाणी पीएमआरडी हद्दीतील मिळकतींसाठी देण्याची मागणी केली आहे. पुणे शहराच्या पाणी बचतीचा अहवाल त्यांनी मागितल्यावर चेतन तुपे यांनी पीएमआरडीएसह जलसंपदा मंत्र्यांवर आज पत्रकार परिषद घेउन जोरदार टिका केली.