Breaking News

पिंपरीमध्ये ’बीआरटी’त मेट्रोची घुसखोरी


पुणे, दि. 17, मे - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. याअंतर्गत शहरात मेट्रोचे काम सुरू असून, यामुळे बीआरटी कॉरिडॉरमधील मेट्रोची घुसखोरी महापालिका प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे. यामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचा खेळखंडोबा झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून जुना पुणे-मुंबई महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग आणि मुंबई-बंगळूरु द्रुतगती मार्ग, असे 3 महत्त्वाचे महामार्ग जातात. यापैकी जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत या शहराचा दुतर्फा विस्तार झाला आहे. या महामार्गावरून विना सिग्नल वाहतूक व्हावी, या हेतूने रस्ता रुंदीकरणानंतर ग्रेड सेपरेटर बांधण्यात आला. 7 वर्षांपूर्वी सर्वात पहिले नियोजन असलेला दापोडी ते निगडी या बीआरटी कॉरिडॉरमधून अद्यापही वाहतूक सुरू झालेली नाही. या महामार्गालगतच पुणे-मुंबई लोहमार्गाचे जाळे पसरले आहे. सार्वजनिक वाहतुकीचा एक महत्त्वाचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध आहे.