Breaking News

शारदानगरीत शिक्षकांसह 9 जूगार्‍यांवर कारवाई


कर्जत : शहरातील शारदानगरीमध्ये जूगार खेळताना 9 जणांवर कर्जत पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये काहीजण शिक्षक असल्याचे समजते. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत शहरातील शारदानगरीमध्ये कर्जत पोलिसांना जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. यावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी तात्काळ पथक तयार करत दुपारी 3 च्या सुमारास शारदानगरी येथे रवाना केले.

यावेळी कर्जत पोलिसांना जुगार खेळताना 9 जण आढळले. यामध्ये विठठल लक्ष्मण पवार, परशुराम भिमराव सुपेकर, राजेंद्र निवृत्ती सरोदे, शांतिलाल किसन गवारे, शरद शामराव सुद्रिक, संजय अंबादास ठोकळ, ऱाघु शांताराम सकट, गणेश माधव जाधव, दादा बाळू कांबळे( सर्व राहणार कर्जत) हे सर्वजण जुगारच्या साहित्यासह रोख रक्कम 23290 पत्यावर पैसे लावून तिरट नावाचा हार-जीतीचा जुगार खेळताना मिळून आले. सदर आरोपींवर सचिन वारे यांच्या फिर्यादीनुसार मुंबई जुगार अ‍ॅक्ट 12 अ प्रमाणे अटक करण्यात आली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शाहदेव पालवे हे करत आहेत. सदरच्या कारवाईमध्ये पोहेकॉ. नरसिंह शेलार, अमोल मरकड, सचिन वारे आदी सहभागी होते. जुगार खेळताना शिक्षकांनाच पकडल्याने या घटनेने शहरात चांगलीच चर्चा रंगली.