पीडब्ल्यूडी घोटाळा : मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या भाच्याला अटक
नवी दिल्ली - पीडब्ल्यूडीमध्ये झालेल्या 10 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यात साधारणपणे एक वर्षानंतर केजरीवाल यांच्या भाचाला अटक करण्यात आली. विनय बंसल असे त्याचे नाव आहे. एसीबीने कारवाई करत त्याला अटक केली.
विनय बंसल याच्या अटकेची पुष्टी खुद्द शाखेचे विशेष आयुक्त अरविंद दीप यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक अशासकीय संस्था चलवणार्या राहुल शर्माने गेल्या वर्षी, पीडब्ल्यूडीमध्ये 10 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार एसीबीकडे केली होती. हा घोटाळा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बहिणीचा पती सुरेंद्र बंसल यांनी के ल्याचा आरोप राहुल यांनी केला होता. त्यांनी पीडब्ल्यूडीच्या नावाने कामे घेतली आणि कामे न करताच खोटी बिले लावून सरकारकडून पैसे घेतले, असेही त्यांनी म्हटले होते.
याप्रकरणी एसीबीने तीन एफआयआर दाखल केल्या आहेत. याप्रकरणातील मुख्य आरोपी सुरेंद्र बंसल होते, मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. मात्र तरीही एसीबी आपला तपास करतच होती. विशेष आयुक्त अरविंद दीप यांनी ईनाडु इंडियासोबत बोलताना सांगितले, की या घोटाळाप्रकरणी एसीबीने सुरेंद्र बंसल यांचा मुलगा विनय बंसल याला अटक केली आहे. एसीबी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या तपासात समोर आले आहे, की ज्या कंपनीने कथित घोटाळा केला आहे त्या कंपनीचा विनय बंसलदेखील मालक आहे. त्यांनी अनेक पत्र पीडब्ल्यूडीला लिहिले आहेत. त्यामुळे तेही या घोटाळ्याचे आरोपी आहेत. एसीबीने गुरुवारी सकाळी पीतमपुरा येथून विनयला अटक केली. त्यांची चौकशी सुरू आहे. दुपारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाऊ शकते.