कर्नाटक निवडणुकीत मद्य व पैशांचा महापूर 168 कोटींचा मुद्देमाल जप्त
बंगळुरू - कर्नाटक निवडणूक दोन दिवसांच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीनंतर कर्नाटक निवडणूक चर्चेत आली आहे ती मोठ्या प्रमाणात जप्त होणार्या मुद्देमालामुळे. आतापर्यंत भरारी पथकाने 168 कोटी रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यात मद्य, भेटीच्या वस्तू, मादक द्रव्ये यांचा समावेश आहे.
आतापर्यंत निवडणूक काळात जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालांच्या बाबतीत उत्तर प्रदेश अग्रभागी आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये 193 कोटी 29 लाख रू पयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. 2016 च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीवेळी 130 कोटी 99 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.
कर्नाटकात निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलली असून राज्यांच्या सीमारेषेवर तपासणी केली जात आहे. दरम्यान, आणखी मुद्देमाल जप्त होण्याची शक्यता आहे.
येत्या 12 मेला कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्या सभांमुळे प्रचार शिगेला पोहोचला आहे.