Breaking News

चुंभळेश्‍वर डोंगराच्या आगीत वनसंपदेसह पशु-पक्षी आगीत भस्मसात


सुपा : पारनेर तालुक्यातील नगर-पुणे महामार्गावरील नारायणगव्हाण येथिल चुंभळेश्‍वराच्या डोंगरास आग लागल्याने अनेक वनस्पती, झाडे, झुडपे, पशुपक्षी आगित जळून भस्मसात झाले. चुंभळेश्‍वर मंदिर परिसरात सुमारे 200 ते 300 एकरचा भव्य दिव्य वनराईने नटलेला अनेक वन्य जीवांच्या वास्तव्याने नटलेला हा सुंदर प्रख्यात चुंभळेश्‍वर महादेवाचा डोंगर याठिकाणी दिवसेंदिवस पर्यटक भेट देवुन जातात. परंतु दोन वर्षापुर्वी याठीकाणी भीषण आग लागली होती, त्यामुळे गावातील तरुणांनी श्रमदान व लोकसहभागातुन चुंभळेश्‍वराला जाणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा वड, पिंपळ आदी वनस्पतींची लागवड याठीकाणी केली. त्याचे वृक्षसंवर्धनही चांगल्या प्रकारे चालले होते.

गेल्या आठवड्यामध्ये शू फिल्म च्या कलाकारांनी याठिकाणी येवुन वृक्षसंवर्धनामध्ये सहभाग घेतला होता. 
मात्र काल या डोंगराला भीषण आग लागल्यामुळे अनेक झाडे, झुडपे, वन्य पशु पक्ष्यांसह त्यांची पिल्ले प्राणी या आगीत भस्मसात झाले. अनेक प्राण्यांचा ऐन उन्हाळ्यात चारा जळाल्यामुळे पशु, पक्षी सैरभैर झाले, शिवाय श्रमदानातुन व लोकसहभागातुन वाढविलेल्या झाडांना भीषण आगीच्या मोठ्या झळाया बसल्या. झाडे तर सर्व जळून खाक झालीच त्याचबरोबर त्या झाडांसाठी आणलेले ठिबकचे पाईप, पाण्याचे डबे जळुन खाक झाले, याठिकाणी आग लागल्याचे समजताच चुंभळेश्‍वर वृक्षारोपन वृक्षसंवर्धन समितीचे शरद पवळे, संकेत शळके, सुदाम नवले, शहाजी नवले, सचिन शेळके, दादाभाऊ नवले, त्र्यंबक नाईक आदींनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही प्रकारची प्रशासणाकडुन मदत न घेता हे काम चालले होते, मात्र अशाप्रकारची घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वनविभागाने डोंगरावर लाईनचे पट्टे मारले असते तर आग आटोक्यात आली असती, परंतु या भागाकडे वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष्य असल्याकारणाने येथिल वृक्षसंवर्धन तर दुरच वन्य प्राण्यांना पाण्याची व्यवस्थादेखील वनविभागाला करता आलेली नाही. याघटनेची सर्वत्र निंदा होत आहे. या घटनेने निसर्गाची मोठी हानी झाली आहे, हे नुकसान न भरुन निघणारे आहे. आपल्याला जीवनदान देणारे एक झाड जगवणे किती कठीण असते, त्यास किती प्रसंगाला सामोरे जावे लागते, याठिकाणी याची जाणीव होत आहे. त्यामुळे वृक्षतोड करताना, डोंगराजवळच्या बांधाचे गवत जाळताना याचा गांभिर्याने विचार प्रत्येकाने केला पाहीजे, पंचक्रोशितील तरुणांनी कोणाच्याही मदतीची वाट न पाहता तात्काळ पाणी देवुन आपल्या झाडांच्या संरक्षणासाठी पुढाकर घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी केले व निसर्गाचे रक्षण करा, निसर्ग तुमचे रक्षण करेल असेही पवळे यांनी सांगितले.


उन्हाळ्यात डोंगरास लागलेल्या आगीत लाखो वृक्ष नष्ट !दर वर्षी राज्य शासनाकडून वृक्षलावगडीसाठी कोटींचे उद्दीष्ठ ठेवले जाते, याच्या संगोपणासाठी लाखोंचा खर्च देखिल केला जातो, मात्र वनविभागाच्या निष्क्रीयतेचा फटका दर उन्हाळ्यात झाडांना बसल्याचे पहावयास मिळते, सुपा परिसरात डोंगरावर लाखो झाडे आहेत, चालू वर्षी सुपा, वाळवणे, रायतळे, रुईछत्रपती, भोयरे गांगर्डा, वाडेगव्हाण, नारायणगव्हाण आदी ठिकाणी डोंगराला लागलेल्या आगित लाखो झाडे नष्ट झाली, तर अनेक वन्यजीव मृत्यूमूखी पडले. उन्हाळ्यात डोंगरावरील गवत वाळलेले असते, शेतकर्‍यांनी आपल्या बांधावरिल ताल पेटवितांना दक्षता घेतली पाहिजे, तर काही समाजकंटकांकडून देखील डोंगर पेटवून देण्याचा घटना घडलेल्या आहेत, भोयरे गांगर्डा येथे विजेच्या सर्कीटमुळे डोंगर पेटला, यामध्ये अनेक झाडे नष्ट झाली. शासनाला वृक्षलावगडीचे महत्व पटले, मात्र वनविभाग सूस्त असल्याचे दिसून येते. याबाबत वनविभागाने पुढाकार घेवून डोंगरावर पट्टे मारणे व गावोगावी जनजागृती करणे गरजेचे आहे.