Breaking News

‘संजीवनी’चे विद्यार्थ्यांकडून कार्पोरेट संस्कृती आत्मसात : मोंजे


येथील ‘संजीवनी’ संस्था विध्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सोयी सुविधा पुरविणारी आणि भविष्यात स्वतःच्या ज्ञानाच्या आणि कौशल्यांच्या आधारावर आत्मनिर्भर करणारी संस्था आहे. येथून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी कार्पोरेट जगताच्या संस्कृतीला लवकर आत्मसात करतील, असे गौरवोद्गार जगप्रसिध्द जीन्स पॅंन्ट बनविणाऱ्या मुंबईस्थित पेपे जीन्स कंपनीच्या मानव व संसाधन विभागाचे संचालक प्रसाद मोंजे यांनी काढले.

संजीवनी एम.बी.ए.मधून २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातून बाहेर पडणाऱ्या विध्यार्थ्यांच्या तुकडीच्या निरोप समारंभ कार्यक्रमात मोंजे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, प्राचार्य डाॅ. डी. एन. क्यातनवार, डाॅ. शांतम शुक्ला , एम. बी. ए. विभागाचे विभाग प्रमुख डाॅ. विनोद मालकर आदी उपस्थित होते. प्रारंभी डाॅ. मालकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून विविध उपक्रमांचा लेखाजोखा मांडला.

मोंजे म्हणाले, कार्पोरेट जगताची संस्कृती आधुनिक होत आहे. या जगतात सामावल्यावर बदल स्विकारणे हे अत्यंत महत्वाचे असते. कंपन्यांमध्ये कसे वागावे, कसे बोलावे, वरिष्ठानां कशी उत्तरे द्यावीत, कार्पोरेट उद्योगासाठी कोणती कौशल्ये हवीत, कंपनी बदलताना घ्यावयाची काळजी या बाबी महत्वाच्या आहेत. यावेळी डाॅ. क्यातनवार यांनी मार्गदर्शन केले. 

अध्यक्षीय भाषणात अमित कोल्हे म्हणाले, भविष्यात ‘संजीवनी’ आणि आपणामधील परस्पर संबंध एकमेकांना पूरक राहतील, याची काळजी घ्यावी. भविष्यात ‘संजीवनी’ सदैव आपल्या पाठीशी राहिल. भविष्यात आपल्यासाठी कोणी बदलणारे नसतात तर परीस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करा, नैतिक मुल्यांची जोपासना करा. विद्यार्थ्यांच्या वतीने प्रसाद साबळे, पुजा बेलुरे आणि प्रिती कराडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विद्यार्थी अर्पल दगडे, सेजल जैन व यश खांबेकर यांनी केले. प्राजक्ता कुलकर्णी हिने आभार मानले.