अनेक वर्षानंतर जोगेश्वरी आखाडा परिसरात ‘मुळा’चे पाणी!
राहुरी : नगरपालिकेच्या जोगेश्वरी आखाडा येथील नागरिकांना थेट मुळा धरणाचे पिण्याचे पाणी देण्याची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्णत्वास आली.जोगेश्वरी आखाडा येथील नागरिकांना एच. डी. पी. पाइपद्वारे पाणी देणारी राहुरी नगरपालिका पहिली पालिका ठरली असून या पाइप योजनेतून नागरिकांना पाणी देण्याची चाचणी आज {दि. ९ } नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे आणि हभप कुंडलिक महाराज डौले यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी, बन्सी भोंगळ, रोहिदास धनवटे, दादा सरोदे, विठ्ठल येवले, सोपान सांगळे, शंकर घारे, अशोक कोबरणे, आदिनाथ भोंगळ, बाबासाहेब सांगळे, शशिकांत धनवडे आदी उपस्थित होते.
भुजाडी म्हणाले, जोगेश्वरी आखाडा, काळे आखाडा,वराळे वस्ती येथील नागरिकांना थेट मुळा धरणातून पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी माजी खा. प्रसाद तनपुरे, सभापती अरुण तनपुरे यांची खूप दिवसांची इच्छा होती. त्याबाबत डॉ. उषाताई तनपुरे नगराध्यक्ष असताना त्यांनी आणि तत्कालीन नगरसेविका सपना भुजाडी यांनी ५ ते ६ वर्षांपूर्वी थेट मुळा धरण येथून पाणी देण्याचा आराखडा तयार करून त्यास मंजूरी मिळविली. सदर योजनेला लागणारी पाण्याच्या टाकीसाठी जागा घेऊन पाण्याचे टाकीचे काम पूर्ण केले. त्यानंतर पाइप लाइन टाकण्यात आले. तीन महिन्यांपूर्वी अंतर्गत एचडीपी पाइपलाईन टाकून आज जोगेश्वरी आखाडा गावातील काम पूर्ण होऊन त्या पाइपलाईनद्वारे नागरिकांना १५५ नळ कनेकशन देण्यात आले. आज जोगेश्वरीच्या पाण्याचे टाकीतून थेट नागरिकांच्या नळाद्वारे पाणी देण्याची चाचणी यशस्वी पार पडली.
मेट्रोसाठी 329 वृक्षांची तोडणी करणार
पुणे शहरातील बहुचर्चित मेट्रोच्या मार्गात अडथळा ठरणाया 329 वृक्षांची तोडणी करण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीसमोर ठेवण्यात आला आहे. त्यावर येत्या आठ दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे. तोडलेल्या अनेक वृक्षांची दुसड्ढया जागी लागवड करण्यात येणार आहे. महापालिकेत वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी आयुक्त सौरभ राव होते. मेट्रोच्या मार्गात अडथळा ठरणा-या 329 वृक्षांची तोडणी करण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीसमोर ठेवण्यात आला आहे. त्यावर सविस्तर चर्चा करुन येत्या आठ दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे. पुणे शहरात पावसाळयात तब्बल 35 हजार वृक्षांची लागवड करण्याचा निर्यण वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शहरात आरक्षित जागेसोबतच रस्ते बांधण्यात आल्यानंतर उपलब्ध असलेल्या जागी वृक्षलागवड होणार आहे. पुणेकरांनी वृक्षलागवडीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापा लिका करणार आहे.