Breaking News

सोनग्रांच्या साहित्यातून अमृताचे दान - डॉ. आ. ह. साळुखे

पुणे, दि. 06, मे - अन्याय दुर करताना सुडाची भावना बुद्ध आणि कबीरांच्या विचारात नाही. वाट्याला आलेले सारे विष पचवून जगाला अमृताचं दान देणारे त्यांचे विचार आहेत. तोच वारसा आपणास ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा यांच्या साहित्यातही दरवळतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले. 

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि तेजस्विनी संस्था यांनी आयोजित केलेल्या आचार्य रतनलाल सोनग्रा साहित्य संमेलन प्रसंगी डॉ.साळुंखे यांचे अध्यक्षीय भाषणावेळी ते बोलत होते..डॉ. साळुंखे म्हणाले, सोनग्रांच्या नावाने साहित्य संमेलन आयोजित केले जाणे हा मानवतावादी भूमिकेचा सत्कार आहे. कारण मानवाच्या कल्याणासाठी आयुष्य वेचलेल्या गौतम बुद्ध, संत कबीर, प्रेशीत पैगंबर, फुले, शाहु, डॉ. आंबेडकर, आण्णाभाऊ साठे आदींच्याविषयी सोनग्रांचे साहित्य आहे. बौद्ध आणि कबीरांच्या विचारांचा प्रसार करण्याचे मोठे कार्य सोनग्रांनी त्यांच्या साहित्यातून केले. यापुर्वी एस. एम. पठाण यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. उद्घाटनपर भाषणात ते म्हणाले, सकस साहित्य प्रेरणा देते. त्यामुळे शालेय जीवनातच वाचनाची गोडी जाणीवपुर्वक रूजवली जावी. त्यातून मणुष्याला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. सोनग्रा यांचे साहित्य असेच प्रेरणा देणारे आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा यांचा पुणेरी पगडी घालून मान्यवरांच्या हस्ते सत्कार क रण्यात आला. सत्काराला उत्तर देताना आचार्य सोनग्रा म्हणाले, सध्या देशात वैचारीक ढोंगीपणा वाढला आहे. विज्ञानाच्या सहाय्याने अज्ञानाचा प्रसार करण्याचा प्रकार भयानक आहे. साहित्यिक ांनी या प्रवृत्तीवर टिकीचे घाव घालावे लागतील.