Breaking News

लांब पल्ल्याच्या रेल्वे थांबत नसल्याने गैरसोय


सोलापूर, दि. 12, मे - कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळावा व जुनी आठवण म्हणून नॅरोगेज इंजिन, डब्बे स्थानक परिसरात ठेवण्याच्या मागणीचे निवेदन रेल्वे स्थानक समितीने खा. विजयसिंह मोहिते यांना दिले. 

निवेदनामध्ये म्हटले आहे, कुर्डुवाडी रेल्वेस्थानक मध्य रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन आहे. देशभरातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरला जाण्यासाठी सर्वांना कुर्डुवाडीला यावे लागते. दक्षिण भारतात विठ्ठलभक्तांची मोठी संख्या आहे. परंतु दक्षिणेकडून येणार्‍या गाड्यांना कुर्डुवाडी स्थानकावर थांबा नाही. यामुळे दक्षिणेतील भक्तांना सोलापूरला उतरून जावे लागते. यामुळे पुणे-सिकं दराबाद शताब्दी एक्सप्रेस, लोकमान्य टिळक एलटीटी एक्सप्रेस, कोणार्क एक्सप्रेस या गाड्यांना कुर्डुवाडीत दोन मिनिटांचा थांबा देण्यात यावा. तसेच बार्शी, कुर्डुवाडी, पंढरपूर, उस्मानाबाद, अक लूज, टेंभुर्णी, ठिकाणच्या कपडे विक्री करणार्‍या व्यापार्‍यांना खरेदीसाठी सुरत, अहमदाबाद येथे जावे लागते. यामुळे गुजरात, राज्यस्थानकडे जाणार्‍या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांना कुर्डुवाडीत थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे.