Breaking News

महिला परिचारिकांचा 15 मे रोजी आक्रोश मोर्चा


सोलापूर, दि. 12, मे - परिचर यांना जगण्याचा अधिकार देण्यासाठी सहा हजार रुपये पगार वाढ द्या, नाही तर त्यांच्या जगण्याचा हक्कच हिरावून घेतल्यामुळे कर्ज बाजारी शेतकर्‍यांप्रमाणे परिचर यांना आत्महत्या करण्याची वेळ येऊ शकते. यासाठी मुंबईत मंत्रालयासमोर अकरा हजार महिला परिचरांचा 15 मे रोजी आक्रोश मोर्चा असेल. त्यामध्ये सोलापुरातील 200 महिला सहभागी होतील, अशी माहिती दत्तात्रय अंदाने यांनी दिली.

ग्रामीण भागात आरोग्य सेवेत सहा ते आठ तास काम करणार्‍या महिलांना प्रतिदिन 40 रुपये दररोज पगार मिळतो. ही आर्थिक शोषणाची दु:खद अवस्था आहे. शासनाच्या मते या महिला गुन्हेगारी जमातीच्या आहेत का? अतिदारिद्र्य रेषेखालील महिलांना आज अशा वाईट अवस्थेत सेवा करावी लागते. आरोग्य सेविकेच्या मदतीसाठी व संरक्षणासाठी 18 ते 22 दिवस गृहभेटी, प्रसूतीच्यावेळी मदत करणे, लसीकरण, मुले एकत्र करणे, साथ नियंत्रण काळात रुग्णांच्या घरी जाऊन भेटी देणे, अशा अवस्थेत त्या जीवन जगत आहेत.